Nashik| चांदवडमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको, 'मविआ'च्या नेतृत्वात आंदोलन

नाशिकच्या चांडवडमध्ये महाविकास आघाडीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक आंदोलन केलं.. यावेळी मोठ्या संख्येनं कांदा उत्पादक शेतकरी देखील सहभागी झाले होते.. जवळजवळ दीड तास विरोधकांनी मुंबई दिल्ली महामार्ग रोखून धरला होता.. कांद्याला किमान 24 रुपये हमीभाव मिळावा आणि विकलेल्या कांद्याला 15 रुपये अनुदान मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी हा आक्रोश महामोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान मविआच्या आंदोलनांतर राज्य सरकारने केंद्र सरकारसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय.. मात्र तोडगा न निघाल्यास शेतकऱ्यांसोबत मंत्रालयाला घेराव घालणार असा इशारा रोहित पवार यांनी दिलाय..

संबंधित व्हिडीओ