बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर आता त्यांचा पक्ष आक्रमक झालाय. आवामी लीग पक्षानं बांगलादेशमध्ये मंगळवारी देशव्यापी बंद पुकारला. त्यामुळे देशात पुन्हा एका अशांतता निर्माण झाली आहे. खरं म्हणजे १३ नोव्हेंबरपासूनच आंदोलनांना सुरुवात झाली आहे. हसीना यांच्यावरील खटला मागे घ्यावा अशी मागणी करत सुरु झालेलं आंदोलन पाच दिवसांत अधिक हिंसक होऊ लागलंय. इतकं की थेट मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचे माध्यम उपसचिवांवरच आंदोलकांनी हल्ला केला.देशभरात जाळपोळ तर सुरुच आहे. पाहूया बांगलादेशमधील स्थिती सध्या काय आहे.