ज्यावेळी शिवसेना फुटली आणि नेते एकनाथ शिंदेंबरोबर गुवाहाटीला गेले... त्यावेळी शिंदेंच्या एका आमदाराची डायलॉगबाजी चांगलीच गाजली होती... ते आमदार म्हणजे शहाजीबापू पाटील... त्यावेळी भाजपबरोबर गेलेल्या शहाजीबापूंना गुवाहाटीतले डोंगर, झाडी आणि हॉटेल चांगलंच आवडलं होतं... त्त्याच शहाजीबापूंना आता त्यांच्याच होमपीचवर भाजपनं एकटं पाडलंय... हे कमी होतं की काय की चक्क शेकापनंही बापूंविरोधात भाजपची साथ दिलीय. शेवटच्या क्षणी सांगोल्यात कशी झाली भाजप आणि शेकाप ही युती आणि त्यावरुन कसा झाला शहाजीबापूंचा संताप.... पाहुया...