दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या आत्मघातकी स्फोटानंतर या स्फोटाची पाळंमुळं शोधण्यासाठी संरक्षण आणि तपास यंत्रणांनी देश पिंजून काढला. दहशतवादाचं हे जाळं नेमकं कुठवर पसरलं आहे याचा तपास घेतानाच काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. काही कट्टरतावादी अन् स्फोटातील दोषींवर तातडीनं अटकेची कारवाईसुद्धा झाली. याच स्फोटातील आत्मघाती हल्लेखोर डॉ. उमर याचा एक व्हिडीओ समोर आलाय.. या व्हिडीओमध्ये उमरने सुसाईड बॉम्बिंगला योग्य म्हटलंय.. डॉ उमर नबी या व्हिडीओतून काय सांगतोय पाहुयात..