अगदी काही दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरं जाणाऱ्या इराणमध्ये आता पूर आलाय. इराणची राजधानी तेहरानमध्ये धऱणांनी तळ गाठलाय तर दुसरीकडे इराणच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस बरसलाय.अब्दानन प्रांताला काही मिनिटांतच या पावसानं झोडपून काढलं. त्यामुळे या प्रांतात मोठा पूर आला. एककीडे तेहरान वाळवंटाप्रमाणे कोरडंठाक पडलंय. तिथल्या धरणांमध्ये केवळ १० टक्के पाणीसाठी शिल्लक राहिलाय तर दुसरीकडे अब्दानन प्रांत पुरानं वेढला गेलाय, पाहूया एकाच देशातला हा वातावरणातला विरोधाभास आणि त्याचा जनजीवनावर होणारा परिणाम....