Global Report | नक्षली हिडमाचा खात्मा, हिडमा संपला; नक्षलवाद्यांना नेमका कसा धक्का बसला? NDTV मराठी

नक्षलवादाविरोधात सुरक्षा यंत्रणांना मोठं यश मिळालंय. देशातील सर्वात धोकादायक नक्षलवादी कमांडरपैकी एक माडवी हिडमा हा मंगळवारी सकाळी चकमकीत मारला गेला. छत्तीसगड-आंध्रप्रदेशच्या सीमेवर ही चकमक झाली. खरं म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांनी हिडमाचा नायनाट करण्यासाठी सुरक्षा दलांना ३० नोव्हेंबरपर्यंतची डेडलाईन दिली होती. त्यानंतर त्याचा आणि त्याच्या साथीदारांचा कसून शोध घेतला जात होता अखेर या डेडलाईनच्या १२ दिवस आधीच हिडमा चकमकीत मारला गेला आणि नक्षल्यांना एक मोठा दणका बसलाय. कशी झाली ही कारवाई... हिडमासह आणखी किती नक्षली मारले गेले. हिडमा संपला म्हणजे नक्षलवाद्यांना नेमका कसा धक्का बसलाय पाहूया यावर सविस्तर रिपोर्ट....

संबंधित व्हिडीओ