बारामती पोटनिवडणुकीसाठी सकाळपासून मतदान सुरूय. अजूनही काही ठिकाणी रांगा आहेत.बारामतीत 5 वाजेपर्यंत 52.44 टक्के मतदान झालंय.सुनेत्रा पवारांसह जय पवार, पार्थ पवार, आणि सुप्रिया सुळेंनी बारामतीमध्ये मतदान केलंय.पण विशेष म्हणजे 2024 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत 72 टक्के मतदान झालं होतं.त्यामुळे यंदा मतदानाचा आकडा घसरला आहे का? अशी चर्चा होतेय.अजित पवारांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होतेय.अजित पवारांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पोटनिवडणुकीत उमेदवार म्हणून उभ्या आहेत. ही निवडणूक बिनविरोध होणं अपेक्षित होतं पण 22 अपक्षांनी उमेदवारी मागे न घेतल्याने इथे निवडणूक पार पडतेय.