रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीवर शिंदेंच्या सेनेतच दोन गट.भाषेच्या प्रेमाला सक्तीची चौकट लावू नका- संजय निरूपम.संजय निरूपम यांची परिवहन मंत्री सरनाईकांना विनंती.मराठी सक्तीचा आणि परीक्षेचा पुनर्विचार व्हावा- निरूपम.मुंबईतील 70% रिक्षा चालक हे बाहेरील राज्यातील आहे. या रिक्षा चालकांनी मुंबईला गती दिली आहे. त्यामुळे या निर्णयामुळे या रिक्षा चालकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.काम चलाऊ मराठी बोलणाऱ्या व समजणाऱ्या रिक्षा चालकांना या शक्तीतून सवलत द्यावी अशी मागणी प्रताप सरनाईक यांच्याकडे संजय निरुपम यांनी केली आहे.