महाराष्ट्रातील राजकारणात आज आणखी एका महत्त्वाच्या पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे...विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असून, त्यामुळेच राहुरीची निवडणूक केवळ स्थानिक नाही तर राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारी मानली जात आहे. भाजपकडून अक्षय कर्डिले मैदानात आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राहुरीत 50.68 टक्के मतदान झालंय. तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत 74.50 टक्के मतदान झालं होतं.