ही तीन वेगवेगळी कारणं आहेत लग्न न जमण्याची.लग्न न जुळणं ही किती मोठी समस्या आहे. ते तीन घटनांमुळे अधोरेखित झालंय.... लग्न झालं नाही म्हणून बुलढाण्यातल्या दोन तरुणांनी आयुष्य संपवलंय... तर मुलगी देत नाहीत म्हणून कोल्हापुरातल्या एका तरुणानं तर गावातच बॅनर लावलंय... शेती, पाणी, रस्ते याचा लग्नाशी किती महत्त्वाचा संबंध आहे, ते सांगणाऱ्या या तीन घटना आहेत.. त्याबरोबरच मुलांची संख्या किती आणि मुलींची संख्या किती, या सामाजिक प्रश्नावर गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आलीय.