धाराशिवमध्ये संपर्क तुटला! धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भूम तालुक्यातील बेदरवाडी गावाला जोडणारा पूल तुटला आहे. त्यामुळे या गावाचा भूमशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. या तुटलेल्या पुलाच्या भागात पुराच्या पाण्यात वाहून आलेली मृत जनावरे अडकल्याचे भीषण चित्र पाहायला मिळत आहे.