बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात जोरदार पावसामुळे सिना, मेहकरी आणि कांबळी नद्यांना पूर आलाय... हिंगणी गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला होता... या पूरस्थितीत गावातील 13 शेतकरी नदीच्या पाण्यात अडकले होते... मात्र तात्काळ कारवाई करत एनडीआरएफच्या पथकाने धाडसी बचाव मोहिम राबवलंय.. या सर्व शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढले आहे... पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केलीय...