सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये गेल्या 48 तासात झालेल्या पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आले आहे... नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.. तापी नदीच्या पाणी पातळीत अजून वाढ होण्याची शक्यता प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.. प्रकाशा बॅरेजचे बारा दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले असून तापी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे... तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेच्या इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला असून अजून पुढील तीन ते चार तासात तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे...