Jayakwadi Dam | गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या गावांना मोठा फटका, गावांमध्ये पूरस्थिती निर्माण

जायकवाडी धरणातून तब्बल 3 लाख क्युसेक्सने पाणी गोदावरी पात्रात सोडल्याने गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या गावांना मोठा फटका बसला आहे. भोगलगाव, सावळेश्वर, गुळज, नागझरी, कवडगावथडी, रिधोरी आणि शेलगाव या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने स्थलांतर प्रक्रिया सुरू केली... स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

संबंधित व्हिडीओ