Paithan Heavy Rain | छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये पावसाचा हाहा:कार, सद्याची परिस्थिती जाणून घ्या

छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात NDRF दाखल झालंय.. पैठण शहरात कालपासून पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली.. त्यानंतर आता बचावकार्यासाठी NDRF पथकं दाखल झाले आहेत.तिकडे पैठणच्या नायगावमध्ये संसार अक्षरशः रस्त्यावर आलेत. अनेक कुटुंब बेघर झाली आहेत.अनेकांनी रात्र जगुन काढली असुन आपला संसार रस्त्यावर मांडला आहे. पैठणच्या गोदावरीला नदीला पूर आल्याने, अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. दरम्यान पैठण शहागड मार्ग देखील पूर्णपणे बंद झाला आहे. त्याच कारण म्हणजे आपेगावजवळ असलेल्या थोटे नदीला पूर आला आहे. तसेच आजूबाजूच्या तीन ते चार गावाचा संपर्क देखील तुटला आहे..

संबंधित व्हिडीओ