Wardha | खरांगणामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश, पंचनामा न झाल्याने शेतातच ठिय्या आंदोलन | NDTV मराठी

वर्ध्याच्या खरांगणा येथे शेतकऱ्यांचा आक्रोश उफाळून आला आहे. अतिवृष्टीमुळे शंभर टक्के पिकं नष्ट झाली, पण अजूनही प्रशासनाचा साधा पंचनामा देखील झालेला नाही. या निषेधार्थ शेतकऱ्यांनी थेट शेतातच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. 50 हजार रुपये हेक्टरी नुकसानभरपाई आणि कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. सरकार आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असेल, तर आम्हाला थेट मुख्यमंत्री यांच्या घरासमोर आंदोलन करावं लागेल,असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे निहाल पांडे यांनी दिला आहे.

संबंधित व्हिडीओ