भाजपने भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री बदलला असून, संजय सावकारे यांच्या जागेवर आता पंकज भोयर यांची नियुक्ती केली आहे. प्रशासकीय कारणांमुळे हा बदल करण्यात आल्याचे म्हटले जात असले, तरी सावकारे यांच्या अनुपस्थितीबद्दल असलेल्या तक्रारींमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. आगामी नगरपालिका निवडणुका लक्षात घेऊनही हा बदल झाला आहे.