मनोज जरांगे-पाटील यांच्या 'चलो मुंबई' आंदोलनाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून शेकडो वाहने मुंबईकडे रवाना होण्याच्या तयारीत आहेत. आंदोलकांसाठी जेवण आणि निवाऱ्याची सोयही केली जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अडथळे आले असले, तरी आंदोलकांचा निर्धार ठाम आहे, असे NDTV मराठीच्या ग्राउंड रिपोर्टमधून समोर आले आहे.