: मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आणि सरकारकडून चर्चेचे प्रयत्न करूनही मनोज जरांगे-पाटील आंदोलनावर ठाम आहेत. 'आरक्षणाशिवाय माघार नाही', असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे सरकारची चिंता वाढली असून, आगामी काळात मराठा आंदोलनाचा मुद्दा सरकारला नक्कीच घाम फोडणार असल्याचे दिसून येत आहे.