मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज पहिली बैठक झाली. समितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बैठकीनंतर माहिती देताना सांगितले की, मनोज जरांगे-पाटील यांच्या मागण्यांचा आढावा घेण्यात आला असून 'सगे सोयरे' संदर्भातही चर्चा झाली. यापूर्वीच मराठा समाजासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या असून त्याचा लोकांना फायदा झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.