जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. नद्यांना पूर येऊन अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे, तर अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. या विनाशकारी नैसर्गिक आपत्तीत जनजीवन विस्कळीत झाले असून, मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे.