Nalasopara | इंस्टाग्रामवर मेसेज केला म्हणून तरुणाला बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

नालासोपाऱ्यात एका तरुणाला इंस्टाग्रामवर मेसेज केल्याच्या कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली, ज्यात त्याचा मृत्यू झाला. प्रतिक वाघे (२४) असे मृत तरुणाचे नाव आहे. तरुणीच्या प्रियकर भूषण पाटील आणि त्याच्या मित्रांनी त्याला रस्त्यात अडवून मारहाण केली. आरोपींनी मारहाणीचा व्हिडिओही रेकॉर्ड केला होता. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सात जणांना अटक केली आहे, पुढील तपास सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ