मनोज जरांगे-पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला न्यायालयाने दिलेल्या मनाई आदेशाचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाल्याचे ते म्हणाले. सदावर्ते यांनी जरांगे यांच्या भूमिकेवर टीका करत, आता त्यांना कायदा किती मोठा असतो हे समजेल असे म्हटले आहे. 'आता जरांगे यांना न्यायालयात येऊ द्या, मग कायदा मोठा की जरांगेंची लांबलेली जीभ मोठी हे दिसेल,' असे आव्हानही त्यांनी दिले.