गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे उद्या सकाळी ११ वाजता सहकुटुंब राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. राजकीय मतभेद असूनही, दोन्ही भावांची भेट होत असल्याने याची जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या घरी जात असल्याने या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.