बुलढाणा जिल्हा कामगार कार्यालयामध्ये विविध तांत्रिक अडचणीचा हवाला देत अधिकृत कामगारांची अडवणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी केल्या जात आहेत.. त्याचबरोबर या कार्यालयात दलालांचा मोठा सुळसुळाट वाढल्याचा आरोपही केला जात आहे, वारंवार विविध तक्रारी येत असल्याने याविरोधात मनसे आक्रमक झाल्याच पाहायला मिळत आहे.. मनसेचे नेते अमोल रिंढे यांनी कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.. यापुढे अधिकृत कामगारांना नाहक त्रास दिल्यास मनसे स्टाईलने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करत अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा यावेळी अमोल रिंढे यांनी दिला आहे..