महायुतीच्या सभांना एक लाख लोक आले तरच आमदारकीची उमेदवारी मिळेल. अन्यथा उमेदवारी देण्याबाबत विचार होईल असा खळबळजनक इशारा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिंदे गटाच्या आमदारांना दिलाय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी भूमीवर महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वीस ऑगस्ट पासून मराठवाड्यात सभा होणार आहे.