नांदेड शहर हे खाजगी कोचिंग क्लासेसचे हब म्हणून ओळखले जाते. नीट पेपर फुटीप्रकरणात यापूर्वी नांदेडचे नाव आले होते त्यानंतर आता पुन्हा एकदा सीबीआय चे पथक नांदेड मध्ये दाखल झाले आहे. या पथकाने मागील वेळेप्रमाणे यावेळीही संशयित पालक आणि विद्यार्थ्यांची चौकशी केली आहे. अद्याप नांदेडमधून कुणालाही सीबीआयने अटक केलेली नाही. आढावा घेतला आहे योगेश लाठकर यांनी.