Chandrapur | चंद्रपुरात गोवंश तस्करांविरोधात पहिलीच मकोकाची कारवाई, गोवंश तस्करांचे धाबे दणाणले

चंद्रपुरात अवैध गोवंश तस्करीविरोधात मोठी कारवाई.गोवंश तस्करांविरोधात पहिलीच मकोकाची कारवाई.कुख्यात गोवंश तस्कर इम्रान बब्बू शेख टोळीवर मकोका. चंद्रपूर जिल्ह्यातील पहिलीच कारवाई,गोवंश तस्करांचे धाबे दणाणले.चंद्रपूर जिल्ह्यात संघटितपणे पाय पसरू पाहणाऱ्या अवैध गोवंश तस्करीविरोधात चंद्रपूर पोलिसांनी आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई केली आहे. कुख्यात तस्कर इम्रान बब्बू शेख आणि त्याच्या टोळीविरुद्ध थेट 'मकोका' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवंश तस्करीच्या प्रकरणात जिल्ह्यात 'मकोका' लावण्याची ही पहिलीच वेळ असल्याने गुन्हेगारी जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे. मुख्य आरोपी इम्रान बब्बू शेख आणि त्याच्या टोळीविरुद्ध यापूर्वीही संघटित गोवंश तस्करीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. ही टोळी सातत्याने सक्रिय असल्याचे पाहून जिल्हा पोलिसांनी मकोका लागू करण्याचा प्रस्ताव नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठवला होता. २५ मे रोजी या प्रस्तावाला मंजुरी मिळताच तस्करांवर 'मकोका'ची कठोर कारवाई करण्यात आली.

संबंधित व्हिडीओ