सरकारी काम टेबलाखालून काही दिल्याशिवाय होत नाही, अशी सामान्य नागरिकांची भावना बनलीय. मात्र, स्वच्छ आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भर आहे. त्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अॅक्शन मोडवर आल्याचं दिसतंय. कारण, तक्रार आल्यानंतर बावनकुळेंनी थेट नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयावर धाड टाकली. यावेळी त्यांना काही अनियमितता आढळून आली. सोबतच एका ड्रॉवरमध्ये पैसेही आढळले. त्यावर बावनकुळेंनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिलेत. इतकंच नाही तर कुठल्याही रजिस्ट्री ऑफिसमध्ये लाच मागितली जात असेल तर थेट आपल्याशी संपर्क करण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना दिलंय.