Chh.Sambhajinagar | चक्क खासदाराच्याच घरी चोरी, शिंदे गटाचे खासदार Sandipan Bhumre यांच्या घरी चोरी

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.शहरात वाढत्या चोरीच्या घटनांवर पोलिसांना अंकुश लावण्यात अपयश येत असल्याची चर्चा सुरू असतानाच आता थेट जिल्ह्याचे खासदार सांदिपान भुमरे यांच्या निवासस्थानीच चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार,अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून एक मोबाईल लंपास केल्याचे सांगितले जात आहे.तर या घटनेचा एक सीसीटीव्ह देखील समोर आला आहे तर या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

संबंधित व्हिडीओ