अपघातावेळी एक विदारक आणि संतापजनक बाब समोर आलीये. रस्त्यावर अपघातानंतर अक्षरशः खच पडलेला होता... अशा परिस्थितीत घटनास्थळी उपस्थित पोलीस आणि स्थानिक नागरिक जखमींना तातडीची मदत मिळावी म्हणून प्रयत्न करत होते.याच दरम्यान शिर्डीकडे जाणारी सासवड पुणे या डेपोतील एसटी बस क्रमांक MH14 MH 7381 ही दुसरी एसटी बस घटनास्थळावर आली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, पोलीसांनी आणि नागरिकांनी बस थांबवण्याचा प्रयत्न केला, चालकाने सुरुवातीला ब्रेकही लावले… मात्र काही क्षणातच बस न थांबवता चालकाने वेग वाढवत तिथून पळ काढल्याचा आरोप करण्यात आलाय..मदतीचा हात पुढे करण्याऐवजी दुर्लक्ष केल्याने उपस्थितांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.