छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात कुणबी प्रमाणपत्र प्रक्रियेत विलंब आणि हलगर्जीपणा झाल्याच्या तक्रारीनंतर कन्नडचे उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आलेत.. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय आयुक्तांना हे आदेश दिले आहेत. गल्लेबोरगाव येथील अर्जदारांनी आठ महिन्यांपूर्वी अर्ज करूनही फाइल्स चौकशी समितीकडे वारंवार पाठवण्यात आल्याने निर्णयास विलंब झाला.. अखेर फेरतपासणीनंतर प्रमाणपत्र देण्यात आले.. दरम्यान, याच कन्नड उपविभागीय कार्यालयातून जिल्ह्यात सर्वाधिक 9 हजार 447 मराठा-कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण झाल्याचीही नोंद आहे.