सुनील तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी मागील दोन दिवसांपासुन महायुतीतील अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.मात्र या भेटीमागचे खरं कारण सुनील तटकरे यांनी अखेर स्पष्ट केलंय. महायुती बळकट करण्यासाठी मी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या असल्याचं तटकरे म्हणाले.एकनाथ शिंदे हे दिलखुलास नेतृत्व असल्याच म्हणत तटकरेंनी शिंदेंची स्तुती केली.एकनाथ शिंदे यांनी मनापासून त्यांची भूमिका या जागेबाबत मांडली असल्याचं म्हणत कोकणातील जागेचा एकंदरीत तिढा सुटल्याचे संकेत तटकरेंच्या बोलण्यातून पाहायला मिळाले.