Dharashiv मध्ये इंधन टंचाईचं संकट; पंपांवर डिझेल नाही असे बोर्ड लागल्याने वाहनचालक त्रस्त

धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा इंधन टंचाईचं संकट गडद झालं आहे. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने स्टॉक नाही असे फलक लावण्यात आले आहेत. धुळे-सोलापूर महामार्गावरील पंपांवर डिझेलअभावी वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुसरीकडे सीएनजीचा पुरवठाही विस्कळीत झाल्याने अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसत आहे. त्यातच सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने वाहनचालकांच्या खर्चातही वाढ झाली आहे.

संबंधित व्हिडीओ