Yavatmal | यवतमाळमध्ये विधान परिषद निवडणुकीवरून गोंधळ; शिवसेनेकडून शितल राठोडांचं नाव

यवतमाळ जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. उमेदवारीवरून महायुतीतच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.यवतमाळच्या जागेवर महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नसून, ही जागा शिवसेना लढवणार असल्याची चर्चा रंगत असतानाच भाजपकडून नितीन भुतडा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे.दरम्यान, शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या सौभाग्यवती शितल राठोड यांचेही नाव चर्चेत असून, ऐनवेळी त्या उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित व्हिडीओ