उष्णतेने हैराण झालेल्या गडचिरोली जिल्हा वासियांना आज सायंकाळच्या सुमारास दिलासादायक पाऊस अनुभवायला मिळाला आहे.जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली असून, सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार सरी कोसळल्या.या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असून, मान्सूनपूर्व पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांनाही आशेचा किरण मिळाला आहे.या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी घेतला आहे.