Delhi मध्ये BJP केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू; राज्यसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची चर्चा होणार

दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली असून, या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडत असून, देशातील वरिष्ठ नेतृत्व या बैठकीसाठी उपस्थित आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, तसेच बी. एल. संतोष, भूपेंद्र यादव आणि सर्वानंद सोनोवाल हे नेते देखील उपस्थित आहेत. दरम्यान आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी आणि रणनीती याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या जागांचे वाटप आणि पक्षाची पुढील भूमिका ठरवण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

संबंधित व्हिडीओ