सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात हालचाली वेग घेताना दिसत आहेत.पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आणि जयंत पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब पाटील, उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.उद्या सकाळी अकरा वाजता सांगली येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे.यामुळे सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत राजकीय रंगत आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.