Sunetra Pawarयांच्या जागी राज्यसभेवर Chhagan Bhujbal? भुजबळांच्या रिक्त जागेवर Sameer Bhujbal लढणार?

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिलाय. त्यांच्या जागी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळतेय. मात्र भुजबळ राज्यसभेवर गेल्यास त्यांच्या रिक्त होणाऱ्या येवला विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागेल. ही निवडणूक छगन भुजबळ यांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दुसरीकडे भुजबळ दिल्लीच्या राजकारणात गेल्यास राष्ट्रवादीचं एक महत्त्वाचं कॅबिनेट मंत्रिपद रिक्त होणार आहे.या मंत्रिपदासाठी धनंजय मुंडे आग्रही असल्याचं समजतंय. तर दुसरीकडे छगन भुजबळ हे आपले कॅबिनेट मंत्रिपद समीर भुजबळ यांना मिळावं यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती मिळतेय.

संबंधित व्हिडीओ