जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. सातगाव डोंगरी येथे ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.