सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'वनतारा'ला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या पशु कल्याण कार्यक्रमावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) स्पष्ट केले आहे. एसआयटीच्या निष्कर्षांमुळे त्यांच्या कामाला बळ मिळाल्याचे 'वनतारा'ने म्हटले आहे.