जालन्यात आरक्षणाच्या मागणीसाठी एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (ST) मधून आरक्षण देण्याची मागणी त्याने केली होती. या घटनेमुळे समाजामध्ये संतापाचे वातावरण असून, उद्या लिंबखेडा येथे रास्तारोको आंदोलन पुकारण्यात आले आहे.