राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी वैयक्तिक कारणांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, राज्य सरकारने पुढील व्यवस्था होईपर्यंत त्यांना काम सुरू ठेवण्याची विनंती केली. त्यामुळे जानेवारीपर्यंत ते कार्यभार सांभाळणार आहेत. ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिली.