केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फ्यूएल बिझनेस स्कूलच्या पहिल्या दीक्षांत समारंभात कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीच्या महत्त्वावर भर दिला. आत्मनिर्भर्तेसाठी अशा शिक्षणामुळे युवकांचे जीवन बदलत आहे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमात फ्यूएल संस्थेचा 19 वा वर्धापन दिन देखील साजरा झाला आणि 200 विद्यार्थ्यांना सीएसआर शिष्यवृत्ती व पदवी प्रदान करण्यात आली.