जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात ढगफुटीमुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. मध्यरात्री अचानक अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांची एकच धांदल उडाली. एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी अनेकांना मोठी धडपड करावी लागली. पूर ओसरल्यानंतरही ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, महिलांनी पुराचा थरार कथन करताना अश्रू अनावर झाले.