आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक सोमवारी (उद्या) होणार आहे. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत मुंबई मनपा निवडणूक स्वबळावर लढायची की महाविकास आघाडीसोबत, याबाबत रणनीतीवर चर्चा होणार आहे.