अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रागाचा कडेलोट झाला की काय असं चित्रं निर्माण झालंय. त्यांनी राग काढलाय तो चीनवर. चीननं अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी बंद केली आणि त्यात काही सुधारणेचे संकेतही दिले नाहीत. चीन ही अमेरिकन सोयाबीनसाठीची मोठी बाजारपेठ बंद झाल्यानं सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका बसतोय. दोन महिन्यापूर्वीच दोन्ही देशांनी एकमेकांवर लादलेले भरमसाठ टॅरिफ काहीप्रमाणात मागे घेतले होते. बोलणी सुरू होती. मात्र चीनचं वर्तन अमेरिकेच्या अपेक्षेप्रमाणे नव्हतं. आणि त्यानंतर अचानक ट्रम्प यांनी चीनवर थेट १०० टक्के टॅरिफ लावलाय. ऐकलं नाही की लाव टॅरिफ ही ट्रम्प यांची सवय एव्हाना जगाच्या अंगवळणी पडलीय त्यामुळे आता चीन अमेरिकेच्या या प्रहाराला कसं उत्तर देतो, पुन्हा एकदा टॅरिफ वॉर पेटतं का पाहूया एक रिपोर्ट.....