डोंबिवलीच्या नांदिवली परिसरात शिंदे गटाचा पदाधिकारी आणि त्याच्या चालकांमध्ये रक्तरंजित राडा झाला.. त्यांनी एकमेकांवर भररस्त्यात चाकू हल्ला केल्याने दोघेही गंभीर जखमी झालेत... शिंदे गटाचे पदाधिकारी सुदाम जाधव आणि त्यांचा चालक मनोज नाटेकर याच्यामध्ये पैशावरून वाद झाला.. त्याच वादातून हा चाकूहल्ला झालाय.. या हल्ल्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.. दरम्यान, मानपाडा पोलिसांनी मनोज नाटेकरला अटक केलीय..