नाशिकच्या नांदूर मधमेश्वर कालव्यातून संभाजीनगरच्या वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुरू आहे मात्र या आवर्तनातून दूषित पाण्याचा प्रवाह होत असल्याचे येवला तालुक्यातील महालखेडा या ठिकाणी निदर्शनास आले या पाण्यामध्ये मृत माशांचा खच देखील आढळून आला आहे. दरम्यान हे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल मात्र सदरचे पाणी हे जनावरांसाठी देखील पिण्या योग्य नसल्याचे बोलले जात आहे.