सिंगापूरमध्ये मध्यवधी निवडणुका पार पडल्या. यात सत्ताधारी पक्षालाच पुन्हा बहुमत मिळालंय.शनिवारी देशात मतदान प्रक्रिया पार पडली.सत्ताधारी पीपल्स अॅक्शन पार्टीनं ९३ जागांपैकी ८२ जागांवर विजय मिळवलाय.तर निवडणुकीआधीच पक्षाच्या पाच जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे ९३ पैकी ८७ जागा पक्षाकडे गेल्यात. २०२०च्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना ८३ जागा मिळाल्या होत्या. तर विरोधी वर्कर्स पार्टीला जेमतेम जागा मिळाल्यात.या विजयामुळे पंतप्रधान लॉरेन्स वाँग यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालंय. वर्षभरापूर्वीच वाँग यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती.त्यांनी विजयानंतर मतदारांचे आभार मानले. आणि यापुढे आणखी ताकदीनं काम करण्याचं आश्वासन दिलं.